पालवी : विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प

  • 4.3k
  • 1.5k

एक दिवस सहज फेसबुक बघत असताना एक व्हिडिओ समोर आला ..मी उस्तुक्तेपोटी काय आहे म्हणून तो व्हिडिओ बघितला.. त्या व्हिडिओने मला आतून एवढं हेलावून सोडलं की मी लगेच त्या व्हिडिओ संबधित संस्थेची माहिती काढली.. प्रभा हिरा प्रतिष्ठन संचलीत *“पालवी”* हा प्रकल्प पंढरपूर येथे सन 2001 पासून चालविला जातो. या ठिकाणी एच .आय.व्ही. पॉझिटिव अनाथ मुले सांभाळली जातात.. पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे..नदीत जसं निर्माल्य सोडावं तसं घराला समाजाला नको असलेल्या व्यक्ती या तीर्थक्षेत्री सोडल्या जातात. यात असतात मनोरुग्ण, अपंग, बेघर. यांचा पण सांभाळ पालवी मध्ये आनंदाने केला जातो. डिंपल ताईला कॉन्टॅक्ट करून मुलांना भेटण्याची इच्छा दर्शवली.. त्यांनी कोविडचे प्रोटोकॉल पाळून