एक कमी

  • 5.2k
  • 1.8k

आॅफिसचा दरवाजा उघडताच आॅफिसचा रंगच बदलून गेला होता. न्यु ईयर ची तयारी जोरात चालू होती. ख्रिसमसमुळे काही दिवस आॅफिसचा मोहोल उत्साही होता. आणि आज तर काय? न्यू ईयर सेलिब्रेशनचा दिवस...प्रत्येकाचे प्लान अगदी चोख ठरले होते...तशीच ती आत आली..डेक्सवर बॅग ठेवलीच होती की मयु बाजूला उभी. डोळ्यावरच्या दोन्ही भुवया उडवत म्हणाली," काय?"" कुठे काय?" मयू जवळ डोळे मोठे करत ती म्हणाली." नाही म्हटल काय? काय प्लान काय आजचा?"तिच्या प्रश्नाला आता काय उत्तर द्याच विचार करतच होती की मयूने बोलण सुरु केल." ठरवल नसशील तर ऐक आॅफिस पार्टी सोड आपण बाहेर चिल्ल करु. प्लान रेडी आहे आणि तुझा चुचा पण येणार आहे."