कोवळ्या कळ्या उमलताना

  • 8.6k
  • 3.1k

क्लिनिक मध्ये कधी कधी अशा केस येतात की आपलं मन सुन्न होतं.. कॉलेज मध्ये जाणारी मुलगी वाटली ती मला.. तिचा चेहरा पाहूनच माझ्या लक्षात आलं की काही तरी गडबड आहे..मी अगोदर हसून तिला बसायला सांगतलं, नाव विचारलं.... खरं सांगितलं की नाही माहीत नाही..काय करतेस ? "कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे." म्हणाली.. जरा स्थिर झाल्यावर विचारलं, आता सांग, काय झालं ? .. "मॅम , माझी पाळी नाही आली... नेहमी अनियमित असते. दोन महिने होऊन गेले अजून आली नाही.. म्हणून आले" .. "आई नाही का आली बरोबर ?" .. तर शांत . थोडी इकडे तिकडे चुळबुळ केली.. "तिला टेन्शन येईल, म्हणून नाही आणलं