वेळ सकाळी सहा-साडे सहाची असेल. केदार अजूनही साखर झोपेतच होता...मोबाईलची रिंग वाजत होती...सकाळी कोण झोपेच खोबर करतय म्हणत त्याने फोन उचलून कट केला... पुन्हा दोन मिनिटांनी मोबाईलची रिंग वाजयला लागली. तसा वैतागत त्याने फोन उचलला...डोळे चोळत स्क्रिन बघितली तर unknown नंबर होता...झोपेतच तो "हॅलो..." बोला समोरुन एका मुलीचा आवाज आला..." हॅलो...केदार बोलतोस ना?" "हा" " हॅलो मी वैभवी बोलतेय. मी मुंबईला आलीय दादर स्टेशनला आहे." तिच्या आवाजात त्याला भीती जाणवत होती "आणि मला इथल काही समजत नाही. तूला वेळ असेल तर प्लीज स्टेशनला येशील का?" खूप वर्षांनंतर त्याने हे नाव ऐकल होत. नाव ऐकताच अंगावरची चादर बाजुला करत तो बेडवर