आता पर्यंत आपण बघीतले.माझ्यासोबत घडलेल्या प्रकारातून सावरायचा प्रयत्न करत असताच दारावर थाप पडली…आता पुढे..!जाऊन दार उघडले तर, बाहेर आई आणि ऋत्वी उभ्या होत्या. मला असं गोंधळलेल्या अवस्थेत बघून लगबगीने आई खोलीच्या आत शिरली आणि संशयित कटाक्षाने संपुर्ण खोलीवरून तिने एक नजर फिरवली. नंतर तिची संशयित नजर माझ्यावर येऊन थांबली. तिच्या या संशयीत नजरेला मात्र मी खूप घाबरले होते!"इतका वेळ काय करत होतीस?" : आई वैतागून, वेगळ्याच संशयीत नजरेने मला विचारू लागली."काही नाही. त….. ते….. मला झोप येत होती. आज खूप थकले होते ना." : मी, घाबरून तिला समजू नये या उद्देशाने विषय टाळत बोलले."नक्की ना." : आई, परत संशयाने! डोळे