चुकीचे पाऊल! - ०३

  • 8k
  • 1
  • 5.3k

आता पर्यंत आपण बघीतले.घडलेल्या प्रकारातून कसेबसे सावरले होते की, परत ओंकारशी माझा सामना झाला!आता पुढे..!बघता बघता तो माझ्या जवळ येऊन समोर उभा राहिला. त्यादिवशी बस मध्ये कमीच विद्यार्थी होते. माझ्या शेजारी बसण्याची जागा रिकामी असल्याने, कोणाच्या नजरेस पडणार नाही अशाप्रकारे मला त्याने दुसऱ्या बाजूला हळूच सरकवले आणि स्वतः माझ्या शेजारी येऊन बसला. तो आणि मी नेहमीच बोलायचो. म्हणून, कोणीच आम्हा दोघांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं समजलं नाही. जरी मला अधून - मधून त्याची भीती वाटत असली तरी, माझ्या बाबतीत घडत असलेलं चूक की, बरोबर हे माहीत नसल्याने किंबहुना मी ते कोणाकडून माहीत करून घेण्याचे धाडसंच केले नसल्याने त्यात काही चुकीचे