चुकीचे पाऊल! - ०९

  • 6.8k
  • 3.8k

आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे यांनी माझी सगळी हकीगत संवेदनशीलपणे ऐकली आणि आम्ही वर्गाच्या दिशेने निघालो. पण, मनात एक प्रश्न पडताच मी त्यांना थांबवून घेतले!आता पुढे..!"मॅडम, माझ्या घरच्यांना हे समजलं तर?" : मी घाबरतंच त्यांना प्रश्न केला, जो मला पडणं स्वाभाविक होता."तुझ्या घरच्यांना आपण समजावून सांगू. ते नक्की समजतील." : त्यांनी माझी समजूत काढली."नाही मॅडम, माझी आई खूप कडक स्वभावाची आहे. ती मला कधीच समजून घेणार नाही." : मी लटक्या सुरात त्यांना सांगितले."कसं असतं बेटा, आपल्याला नेहमी हेच वाटतं की, पुढचा आपल्याला समजून घेणार नाही आणि आपण त्याच गैरसमजातून मोठ-मोठ्या चुका करून बसतो. एकदा चुकीचे पाऊल पडले की, परत ते