️©सौ. शिवानी श्री वकील© सूर्य उगवला की आन्हीकं आवरुन बबई न बांधलेला भाकर तुकडा घेऊन पडीक जमिनीवर नांगरायला जायचा कुशाबाचा दिनक्रम काही महिन्यांपासून सुरु होता. तसं म्हटलं तर चांगले चार भाऊ, दोन बहिणी यांचे संसार, जमिन जुमला भरपुर, पण व्यवहार कधीच कुशाबाला कळला नाही. त्यामुळे भावंड त्याला वेडाच समजत. लिहीता वाचताही कितपत येत होतं हेही त्याचं त्यालाच माहीत, त्यामुळे नंतर ही जबाबदारी आपल्यावर नको म्हणून भावंड त्याच्यापासून दूर रहात. आई-बाप होते तोवर त्याच वरकाम करुन निभावलं, पण त्यांच्या पश्चात भावंडांनी वाटण्या करुन चांगली बागायती जमिन स्वतःला घेतली. ह्याला दिला एक पडिक जमिनीचा तुकडा कसायला.......असं का केलत म्हणुन तो कधीही भावंडांशी