माझ गोकुळ

  • 5.7k
  • 2.3k

माझ गोकुळ मी समोरच्या छोट्या पण देखण्या वास्तूंकडे समाधानाने पाहिले. ' माझ गोकुळ ' या नावाचा तो वृध्दाश्रम होता तर त्याच्या डव्या बाजूला' फुलपाखरे ' हे मुलीचे वसतिगृह होते. या दोन्ही वास्तूंचे आज उदघाटन होत.रंगबेरंगी पताका सर्वत्र लावल्या होत्या. सनईचा मंद व मधुर स्वर मनाला सुखावत होता.मला खात्री होती की दूर अंतराळातून गोजिराबाई हे सारे आनंदाने पाहत असणार.एवढ्यात व्यवस्थापक भोसले व वकील नाईक माझ्याजवळ आले."सर या, सारी तयारी झालीय." भोसले म्हणाले." अगदी छोटेखानी कार्यक्रम करायचाय. तुम्ही नारळ वाढवा आणि वास्तुदेवतेची पूजा करा." नाईक म्हणाले."होय; चला." मी समोरच्या वास्तूंना नमस्कार केला. माझ्या डोळ्यासमोर गोजिराबाई उभ्या राहिल्या. बरोबर तीन वर्षांपूर्वी मी बीएड