नमुने - 2

  • 5.3k
  • 2.1k

रिक्शा सोसायटीच्या गेटवर थांबली. मी उतरलो. पैसे दिले. गेट समोर पारधे काका आणि अम्या बोलताना दिसले. " मी आता काय सांगितल ते ऐक. बाकीच विसर. साॅरी म्हण आधी. आणि परत अस रस्त्यावर बोललास तर याद राख." पारधे काका एकमद सुनावण्याच्या मुड मध्ये होते. अस दिसत होत. समोरुन मी येतोय बघताच. रोजच्या टोमण्याच्या स्वरात काका म्हणाले," काय रे बॅटरी कुणी कडे गेलेलास उंडगायला? जेव्हा बघाव तेव्हा हात फळकुट घेऊन फिरतोय? बॅट तरी पकडता येते का?" अम्या कडे बघत म्हणाले," हे टोनक क्रिकेट खेळतय?" आपण काही सर्वोत्तम विनोद केला अशा गैरसमजातून काका माझ्याकडे बघून हसले. तेवढ्यात बाजूने दुबे काकांचा पोरगा बाईक वरुन