इर्षाळगड : आमचा पहिला नाईट ट्रेक

  • 5.6k
  • 1.8k

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अचानक कोरोना पेशंट ची झालेली वाढ , यामुळे हा महिना खुपचं दगदगीचा चालला होता. रिफ्रेश होण्यासाठी ट्रेकला जायचं म्हटलं तर महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे, खबरदारी म्हणून गडकिल्ले आणि पर्यटनस्थळे बंद ठेवली होती. त्यामुळे "महाराष्ट्र देशा" ट्रेक ग्रुपवर पण काही अपडेट येत नव्हते. हळू हळू कोरोना पेशंटची संख्या कमी होवू लागली. वातावरण जरा निवळायला सुरवात झाली.. भटके, भटकंती साठी बाहेर पडू लागले..मी आशेने प्रसादचे ( महाराष्ट्र देशा ट्रेक ग्रुप) स्टेटस चेक केले तर त्याने येणाऱ्या ट्रेकची जाहिरात टाकली होती.. त्यातल्या त्यात आपल्याला कोणता जमू शकतो याची चाचपणी करून मी आणि अनिलने इर्षाळगड करण्याचे ठरवले.. रोहितला मेसेज करून