अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग १०)

  • 8.3k
  • 1
  • 4.4k

रागिणीला रात्रभर झोप आली नाही.रघुवीर आणि जानकीचे फोटो सारखे तिच्या डोळ्यांसमोर येत होते.सकाळी ती लवकर उठली आणि आज काहीही करून रघुवीर ला बँकेत जाऊन भेटायचं अस तिने ठरवलं..पण रघुवीर चा ब्रेक टाइम दुपारी दोन चा असतो हे तिला माहिती होत त्यावेळी ती बँकेत पोहचली .रघुवीर कँटीनमध्ये त्याच्या सहकार्यांसोबत होता..सगळे त्याच अभिनंदन करत होते..रघुवीर चा बेस्ट फ्रेंड असलेला दिनेश जाधव हा सुद्धा तीन महिन्याच ट्रेनिंग आटपून बँकेत परतला होता..त्याच लक्ष अचानक रागिनीकडे गेले.."रघु ..समोर बघ ,रागिणी" दिनेश म्हणाला.. रघुवीर ने रागिणी कडे पाहिलं ती रागात होती.ती रागारागाने त्याच्या कडे गेली.." अभिनंदन रघुवीर" रागिणी खोचकपणे म्हणाली.." थँक्स..पण तुला कस कळलं" रघुवीर म्हणाला.."ते