अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१२)

  • 8.7k
  • 4.6k

जानकीसाठी एक एक दिवस मोठा कठीण चालला होता.घरापासून दुरावण्याचं दुःख तर होतच पण त्याहीपेक्षा आपल्या माणसांना फसवण्याचं दुःख त्यापेक्षाही जास्त होत.तिच्या मनात बरेचदा आलं की मानसी जवळ सगळं सांगून मोकळं व्हावं पण तिची हिंमत होत नव्हती. दोन्ही लग्न घरी तर उधाण आलं होतं.मधल्या दिवसात अग्निहोत्रींकडे देव कुटूंबीय व्याही भोजनाला येऊन गेले होते. लग्न पत्रिका वाटून झाल्या होत्या.लग्न घरी पाहुणे मंडळी येणं सुरू झाले होते.कामातून कुणालाही सवड नव्हती.प्रत्येक जण म्हणत होता की जानकीला खूप चांगला नवरा आणि खूपच छान सासर मिळालं.देवांच्या घरीही पाहुणे येऊ लागले होते. सवाष्णीनीं मिळून लग्नाची हळद दळली होती.जानकीला प्रत्येक जण घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवत होते.उखाणे पाठ