कल हो ना हो

  • 6k
  • 1
  • 2.2k

काल रात्री दीडच्या सुमारास मोबाईलची रिंग वाजली. एक डॉक्टर असल्यामुळे मला असं रात्री अपरात्री येणाऱ्या फोन कॉल्सची सवय आहे.. कोणीतरी पेशंट असणार, असचं मनात आलं..फोन हातात घेतला तर स्क्रीनवर अगदी जवळच्या मैत्रिणीचं नाव, मनात शंकेची पाल चुकचुकली. थोड्या अनामिक भीतीनेच फोन हातात घेतला.. "स्वाती , सुमन आपल्याला सोडून गेली गं...""काय ? केंव्हा ? असं कसं अचानक ? गेल्या आठवड्यातचं माझं नि तिचं बोलणं झालं होतं . तेंव्हा तर छान बोलली की माझ्याशी "अलका माझी मैत्रीण, रडत रडतच सांगू लागली.."काल संध्याकाळी अचानक तिच्या छातीत खूप दुखायला लागलं म्हणून घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं . डॉक्टरांनी तिला तीव्र हृदय विकाराचा झटका आला