काळ रात्र होता होता... - 1

  • 6.5k
  • 2.9k

काळरात्र होता होता... १. पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. धोधो पाऊस पडून गेला होता, तरीही पावसाची बारीक संततधार सुरूच होती. आज रोजच्या पेक्षा थोडं लवकरच काम उरकले होते. निदान आज तरी घरी लवकर पोहोचू या खूशीत अॉफिसमधून बाहेर पडलो, पण रस्त्यावर वाहनांची हू म्हणून गर्दी दाटलेली. रात्रीचं लुकलुकणाऱ्या काजव्यांचे मोहोळ नजरेसमोर घोंघावत रहावं, तसं वाहनांच्या लाईटच्या उजेडात आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे बारीक तुषार चमकून डोळे दिपवून टाकत होते. घरी लवकर पोहोचण्याच्या उत्साहावर पावसाने पाणी फिरवले होतेच, पण वाहनांच्या दाट गर्दीतून वाट काढत पुढे पुढे सरकत राहणे तेवढेच आपल्या हातात होते. दिवसभर कमी अधिक पाऊस पडतच होता, त्यामुळे हवेत कमालीचा