काळ रात्र होता होता... - 2

  • 6.3k
  • 3.2k

काळरात्र होता होता... २.आज मला तो अगदी खूप जवळचा मित्र असल्यासारखं समजून आपल्या दुःखाची झोळी पुर्णपणे उलटी करत होता. आपल्या मनात इतके दिवस साठलेलं दुःख झाडून झाडून खाली करत होता." गणेश तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण यात मी काय करू शकतो?"कितीतरी वेळ गणेशच्या कंठात धडका मारत असलेल्या हुंदक्याचा अखेर बांध फुटला, म्हणाला,"अरे, ती आत्महत्या करायला गेलीय."'आत्महत्या' हा एकच शब्द ऐकला, अन् अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. माझ्या तोंडातून आपसूकच शब्द निघाला,"आत्महत्या?!..." " हो, आत्महत्या... आत्ताच ती आतल्या खोलीत गेलीय न् आतून दरवाजा बंद करून घेतलाय. मी तर खूप घाबरलोय. सगळं सुचवायचं बंद झालंय." , घाबऱ्याघुबऱ्या झालेल्या गणेशला बोलणं उरकेनासं