काळरात्र होता होता... ३. अपेक्षेप्रमाणे, त्यांनी मनात खोलवर साचलेलं आपलं दुःख उघडं करत त्याला वाट करून द्यायला सुरुवात केली, "आजपर्यंत कुठलीही गोष्ट माझ्या मनासारखी घडली नाही. कदाचित मला मिळालेला जन्मही मला नकोसा होता. म्हणूनच की काय, माझ्या जन्माच्या वेळी माझी आई मला कायमची सोडून गेली. लहानपणी आईच्या मायेचं सुख कधी अनुभवायला मिळालेच नाही. तारुण्यात असताना एक जीवलग वाटावा असा मित्र भेटला, ज्याच्यावर आपलं सगळं जीवनच अर्पण करावं असं वाटलं, पण त्याचं जगणं म्हणजे 'लिहिणं' होतं. एकदा, त्याला मी म्हणाले, " कथा, कविता लिहिण्याचा छंद पाळणं, म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. अशा कथा आपल्या जीवनावर जातात. आजपर्यंत कुठल्या लेखकाचं जीवन सुखात