नक्षत्रांचे देणे - ३३

  • 5.6k
  • 3.1k

‘आज्जो आणि मिस्टर सावंत यांनाही मैथिली तितकीशी आवडत नव्हती. त्यामुळे ते दोघेही काहीही बोलले नाहीत. आता मैथिलीशी तसाही त्याचा काहीही संबंध नव्हता. तिचे खरे रूप सगळ्यांच्या समोर आलेले होते. तरीही मैथिली शुद्धीवर आल्यावर माझ्या आयुष्यात वादळ येईल, असे घरच्यांना का वाटते? याचेच क्षितिजला नवल वाटत होते. 'यापुढे कोणताही निर्णय आम्हा दोघांना विचारल्याशिवाय घेत जाऊ नका.' असे क्षितिजने घरच्यांना बजावले होते. या विषयी भूमीशी बोलल्याशिवाय त्याला राहवेना म्हणून त्याने फोन लावला. पलीकडून तिने फोन उचलला होता.’ ''हॅलो.'' भूमी ''हाय, झोपली नाहीस अजून?'' क्षितीज ''नाही, जस्ट फ्रेश झाली. झोपतेच आहे.'' भूमी ''पार्टीमध्ये जे झालं त्यासाठी सॉरी.'' क्षितीज ''ठीक आहे. कोणीही आपल्याला गृहीत