नक्षत्रांचे देणे - ३४

  • 6.5k
  • 3.7k

'मिस्टर सावंतांच्या सांगण्यावरून बाहेर टफ सिक्युरिटी ठेवण्यात आली होती. मीडिया आणि बाकीच्यांना चुकवून क्षितीज कसाबसा कंपनीत पोहोचला होता. त्याने पळत येऊन भूमीची केबिन गाठली. ''सॉरी, एक्सट्रीमली सॉरी. मला यायला उशीर झाला.'' क्षितीज ''मला घरी जायचं आहे. सो प्लिज तेवढी हेल्प पाहिजे.'' क्षितिजला पाहून हाताचा आधार देत भूमी सावकाश उठली. आपली बॅग आणि मोबाइल दुसऱ्या हाताने पकडून ती उभी राहिली. तिचा तोल जातोय हे क्षितिजला समजलं. त्याने आपल्या हाताचा आधार देत तिला पुन्हा बसवलं. ''तुला उठता येत नाहीय, थोडावेळ बस इथे. बरं वाटत नाहीय का?'' ''मी ठीक आहे. मला घरी जायचं आहे.'' पुन्हा खुर्चीवर बसत भूमीने डोक्याला हात लावला. डोकं फारच