नक्षत्रांचे देणे - ४४

  • 6.9k
  • 3.6k

भूमी भारतात परत आल्याचे समजल्यावर नानांनी तिला फोन लावला. ''हॅलो बेटा, कशी आहेस?'' नाना ''मी मस्त. तुम्ही कसे आहेत ? आणि माई?'' भूमी ''आम्ही अगदी मजेत. इकडे गावी केव्हा येणार आहेस? ये आम्हाला भेटायला. तुला बघावंसं वाटतंय.'' नाना ''हो,तुम्हाला भेटायला लवकर येणार आहे. इथे थोडं महत्वाचं काम आहे. ते संपल्यावर येते.'' भूमी ''क्षितिजला भेटलीस का? तो अधून मधून चौकशी करण्यासाठी फोन करतो आम्हाला.'' नाना ''हो. भेटले. मस्त मजेत आहे सगळं. तुम्ही काळजी घ्या, फ्री झाल्यावर फोन करते मग, माईंशी बोलेन.'' भूमी ''आत्ता घाईमध्ये दिसतेस. बर बरं सावकाश फोन कर.'' म्हणत नानांनी फोन ठेवला. भूमी फोन कट करून विचार करू लागली.