नक्षत्रांचे देणे - ४६

  • 7k
  • 3.7k

'क्षितिजचे पप्पा भूमी आणि क्षितिजचा विचार करत बसले होते. काही महिन्यांपूर्वी घरात हसतं खेळतं वातावरण होत. दोघांचा साखरपुडा झाला, लग्न होणार होत. आणि सगळं काही अचानक विस्कटवून गेलं. होत्याच नव्हतं झालं. विभासने येऊन मेघाताईंच्या मनात भूमी बद्दल संशय निर्माण केला आणि त्यानंतर गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. पण भूमी अचानक लंडनला का निघून गेली? त्यामागे काय कारण होते? सत्य काय आहे? हे तिने विश्वासात घेऊन क्षितिजच्या कानावर घातले असेल तर हि वेळ आली नसती. कदाचित त्यामागेही तिचा काहीतरी हेतू असेल. होतात चुका. माणूस म्हंटल तर हे होणारच, पण या गोष्टच परिणाम होऊन क्षितिज एवढा बदलून जाईल. हे त्यांना मुळीच पटलेले नव्हते.