नक्षत्रांचे देणे - ४९

  • 6.7k
  • 3.4k

निधी अजूनही निल सोबत डान्स करत होती. क्षितीज आणि भूमी, ते हि एकत्र तिथे आलेले पाहून तिला फारच आनंद झाला. तिने क्षितिजला वरती डान्स करण्यासाठी बोलावले आणि भूमीला घेऊन तो स्टेजवर गेला. 'ना है ये पाना ना खोना ही है तेरा ना होना जाने क्यूँ होना ही है तुमसे ही दिन होता है सुरमई शाम आती तुमसे ही, तुमसे ही.' हे गाणं सुरु झालं होत. ''सो पार्टनर, नानांची तब्येत कशी आहे आता?" क्षितीज डान्स करता करता भूमीला विचारत होता. ''एक दिवसात नाही सांगता येणार, पण थोडे दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल.'' भूमी ''आणि तुझी?'' क्षितीज ''माझी? मला काय झालाय?'' भूमी