नक्षत्रांचे देणे - ५०

  • 5.3k
  • 2.8k

'जवळपास तासाभराने भूमीला जाग आली, क्षितीजने गाडी थांबवली होती. आणि तो तिच्याकडे बघत होता. कदाचित तो तिच्या उठण्याची वाट बघत असावा. तिने समोर पहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. ती चक्क आश्रमाच्या समोर होती. तिचा आश्रम लहानपणीच्या आठवणींचा आश्रम. कितीतरी महिने ती इकडे फिरकली सुद्धा नव्हती. आज क्षितिजमुळे ती पुन्हा तिथे आली होती. त्या लहान सवंगड्याना भेटायला.' ''क्षितीज विश्वास बसत नाही रे, थँक्स, थँक्यू सो मच.'' म्हणत उतरून ती आश्रमाच्या फाटकातून आत निघाली. क्षितीज गाडी पार्क करून तिच्या मागे आश्रमात जाऊ लागला. तेथील मुलांनी तिला बघून एकच गलका केला होता. ''भूमी दीदी आली.'' म्हणत सगळे तिच्या दिशेने आले. धावत येऊन