नक्षत्रांचे देणे - ५१

  • 5.4k
  • 2.8k

गाडी हमरस्त्याला लागली होती. 'नया कल चौखट पर है आज उस पर एतबार कर कब तक बीते कल में उलझेगा चल आज एक नई शुरुआत कर..!' म्युझिक प्लेअर वर लागलेली शायरी ऐकत क्षितीज गाडी चालवत होता. आणि भूमी नेहेमीप्रमाणे त्याच्या बाजूला सीटवर रेलून झोपलेली होती. गाडी शहराकडे भरधाव वेगाने निघाली होती. तेव्हा भूमीला जाग आली. ''क्षितीज आपण पोहोचलो का?'' ''नाही, दहा मिनिटात पोहोचू.'' '' माझं घर तर मागे गेलं ना, तू पुढे कुठे निघाला आहेस?'' भूमी बाहेर रोडकडे बघत म्हणाली. आणि क्षितिजने ब्रेक लावला, गाडी जागीच उभी झाली होती. ''आपण माझ्या घरी आलोय, माझ्या आई-पप्पांच्या घरी. त्यांना भेटायला.'' क्षितीज गाडीतून