*देवाविषयीचे प्रश्न* : -----१) देव कुठे आहे?२) देव काय पाहतो?३) देव काय करतो?४) देव केव्हा हसतो?५) देव केव्हा रडतो?६) देव काय देतो?७) देव काय खातो?*१) देव कुठे आहे?* – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे || - नामदेव…विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला || - ज्ञानदेव…*२) देव काय पाहतो?* – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ | - श्रीशंकराचार्य…त्याच्या