लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग १

  • 14.3k
  • 7k

खूप दिवसांनी , नाही नाही खूप वर्षांनी आम्हा मैत्रिणींची चांडाळ-चौकडी आज भेटली होती. कॉलेजपासूनची आमची चौघींची मैत्री.त्यावेळच्या आमच्या उचापती बघून आम्हाला चांडाळ-चौकडी हे नाव पडलं होतं.. धम्माल करायचो आम्ही कॉलेज मध्ये असताना..कॉलेज विश्व संपलं आणि प्रत्येकीचा मार्गही बददला.. भेटणं खूपचं कमी झालं.पण आम्ही फोन वरती आणि व्हिडिओ कॉल्सवरती नेहमी एकमेकींच्या संपर्कात असायचो.त्या फोनरुपी भेटीला समोरासमोर मारलेल्या गप्पांची सर थोडीच येणार ! तरीही आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घ्यायचो..एक दिवस मात्र नीलाचा फोन आला.." स्वाती मी ,राधा आणि मीनाला फोन करून सांगितलं आहे की आपण पुढच्या महिन्यात दोन दिवस वेळ काढून भेटतोय. त्यांनी अगोदर थोडे आढेवेढे घेतले पण मी कोणाचंही ऐकलं