लालसा

  • 5.7k
  • 2k

लालसा इतिहास संशौघनाची आवड आणि दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा माझा छंद माझ्या मित्रांना चांगलाच ठावूक होता. त्यमुळे या संर्दभात एखादी माहिती कळाली की ते मला लगेच कळवत.माझ स्वत:च वस्तू सहंग्रालय आहे.मी गोळा केलेल्या वस्तू तिथे कलात्मक पध्दतिने मांडलेव्या आहेत.प्रत्येक वस्तूची माहिती मी त्या वस्तूच्या बाजूला लिहून ठेवलीय.त्यात ती वस्तू कधी व कुठे मिळाली;तिचा काळ व इतिहासाच्या दृष्टिने तिचे महत्व मी नमूद केलय. अर्थात हया वस्तू मला सहजा-सहजी मिळालेल्या नाहित.काही वेळा मला अनाकलनीय प्रसंगाना तोंड द्याव लागलय. संहग्रालयाच्या डाव्या बाजूला एका जाड काचेच्या पेटीत अर्धा फूट लांब खंजीर व सुर्वण अंगठी आहे. खंजीराच्या मुठीवर सुंदर कोरीव काम व काही चिन्ह आहेत