राजमाची ट्रेक आणि काजवा महोत्सव-एक दुग्ध शर्करा योग.. 

  • 8.2k
  • 1
  • 2.4k

मार्च महिना सुरू झाला. प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारा, घरातून बाहेर पडणंही नको नकोसं वाटत होतं..माझं मन मात्र दुसऱ्याच गोष्टीमुळे अस्वस्थ झालं होतं. "महाराष्ट्र देशा" ग्रुपवरती नेहमी प्रमाणे ट्रेकच्या जाहिराती येत होत्या..त्यातील काही ट्रेक तर आम्हा दोघांचे ड्रीम ट्रेक होते.. पण माझ्या मनाने आणि शरीराने वाढत्या उन्हाळ्यापुढे हार मानली होती .. ते ट्रेकसाठी तयारचं होत नव्हतं.. अनिलची जायची खूप इच्छा होती परंतु बायको नाही येत म्हटल्यावर त्यानेही बायकोच्या प्रेमाखातर म्हणा किंवा खूप समजूतदार नवरा म्हणा .. ( आपण एकटे हिला सोडून ट्रेकला गेलो तर त्याचे काय दुष्परिणाम होतील हे त्याने एवढ्या वर्षाच्या संसारात बरोबर ओळखलं आहे ) तात्पर्य : ट्रेकचा