पूर्तता

  • 6k
  • 2k

पूर्तता माणसांनी तुडुंब भरलेल्या त्या हाॅलमध्ये पाऊल ठेवताच माई थोड्या बावरल्या---तेवढ्याच गहिवरल्यासुध्दा.आपल्या मुलाच्या कर्तुत्वाचा त्यांना अभिमान वाटला.नाहीतरी आपण कोण?कुठल्या?आज आपली ओळख आहे ती पुरूषोत्तम दळवीची आई म्हणून!होय!' जन्मदात्री आई ' बस्स एवढेच ! माईंना थोडा विषादही वाटला.आज त्यांचा साठावा वाढदिवस साजरा होत होता.त्यासाठी पुरूषोत्तमाने मुंबईतल्या व्हि.टी.सारख्या पाॅश एरीयात कार्यक्रम ठेवला होता. निमंत्रण मिळालेले व न मिळालेले लोक सुध्दा---नुसत्या ऐकिव बातमीवरुन आले होते. पुरूषोत्तमाचा लोकसंग्रह अफाट होता. सहकार क्षेत्रातल्या त्याच्या कर्तृत्वाने वेगळीच उंची गाठली होती. मुंबईतील एका मोठ्या सहकारी बॅंकेचा अध्यक्ष---अनेक सहकारी संस्थांचा संचालक व कामगार चळवळींशी संबधित असल्याने अनेक मातब्बर मंडळींशी त्याची ओळख होती.म्हणूनच आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातल्या