अपत्यकामेष्ठी...

(11)
  • 12.4k
  • 3.9k

!. . . . . . .अपत्यकामेष्ठी . . . . . .. . . . .खरंतर तिच्या मनाविरुद्धच गोष्ट घडली दोघांच्या वयात १२ वर्षाचा फरक.नाय व्हय म्हणंत बापान हिरीत ढकलावी तशीच यदु गायके नावाच्या इसमासोबत सगुणाच लग्न लावुन दिलं.तिच एेकनार कोण सातवीतनं आठवीत जायचं म्हणुन खुश होती.त्यातच लग्नाचा घाट घातला.सासरकडच्यांनी तिला सांभाळुन घ्यायच म्हणत म्हणत नवर्‍यासकट सवती ठेवली. कारण लग्नाला २ सालं झाली पण कुस उजवणां म्हणुन त्या नवतरुणीला नकळत टोमने मिळु लागले. कोणत्याही शुभ कामात तिला टाळु लागले.नवर्‍याचं मात्र एक ना दोन त्याला काही सांगावे तर तोही 'असुदे बघुया 'म्हणुन वेळ मारुन नेऊ लागला.दवाखाना करावा अशी दोघांची मानसिकता