धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1

  • 8.8k
  • 1
  • 4k

धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 1 विजांच्या कडकडाटने अचानक जाग आली.. मोबाईल बघितला, तर पहाटेचे साडेतीन वाजले होते..थोड्याच वेळात आम्हाला माथेरानसाठी निघायचं होतं..तसा मी सव्वा चारचा गजर लावला होता पण "दामिनी मॅडमनी" थोडं अगोदरचं मला उठवलं..बेडरूमचा पडदा बाजूला करून बघितलं तर मॅडम एकट्याच नव्हत्या त्यांच्या सोबत वरुण देवही आपलं अस्तित्व दाखवत होता..... मनात आलं आज काही खरं नाही आपल्या ट्रिपचं ...तशीच थोडा वेळ पडून राहिले पण झोपच येईना मग उठून तयारीला लागले..अनिलला उठवून अंघोळीला जायला सांगितलं.. फक्कडसा चहा बनवावा या विचाराने मी दुधासाठी फ्रिज उघडला..अरेच्चा ! दुध कुठं गेलं. काल तर अगदी आठवणीने चहा पुरतं काढून ठेवलं होत.. आधी वाटलं माझी