काळा चहा ...

  • 9.8k
  • 3.3k

काळा चहा. . .जनार्दन आज लवकरच उठला .तारीख होती आज कोर्टाची . सरिता त्याची बायको. माहेरच्या संपत्तीची जमिनीच्या तुकड्याची कायदेशीरपणे वाटणी व्हावी यासाठी तिच्यात भावात वाद सुरु होता.सकाळची गुरांना वैरणपाणी करुन ११ ला कोर्टात हजर होण्यासाठीच त्याची लगबग.सरितान सुद्धा लहानग्या मुलीच्या प्रगतीच्या शाळेचा खाडा करुन तिला तालुक्याला फिरायला जायचंय म्हणुन तेल पावडर करुन चहा बटर खायला घालुन तयार केली भाबडी पोर ती.तिला काय माहित आपले आई बाबा तारखेला चाललेत.जनार्दनने आपली सी.डी १०० होंडा काढली मुलगीला मधे बसवुन सरितासह तो उमरखेड तालुक्याला निघाला.सरिता अधुनमधुन " सावकाश घ्या" म्हणुन सांगायची.तिच्याकडे दुर्लक्ष करत तो खड्डा येताच "आवळुन धरा" म्हणत गाडी रेमटायचा.जनार्दनला आधीपासुनच कोर्ट