धुक्यात हरवलेलं माथेरान... भाग 3

  • 7.2k
  • 1
  • 3.2k

हॉटेलच्या लॉबीत आम्ही स्थानापन्न झालो.. अनिलने रिसेप्शन काउंटरला जाऊन आमची ओळखपत्र जमा केली.. रिसेप्शनिस्टने हसून स्वागत केले आणि थोडा वेळ बसण्यास सांगितले.. लॉबी चांगलीच प्रशस्त होती.. एका बोर्डवर आजचा नाश्त्याचा आणि जेवणाचा मेनू लिहला होता.. मेनू बघून जेवण मस्तच असणार याचा अंदाज येत होता.. कमीत कमी पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नाश्त्यामध्ये होते.. दुपारच्या जेवणाचीही अशीच चंगळ दिसत होती.. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आणि त्यात खूप सारे पर्याय... अस्सल खवय्ये लोकांसाठी तर पर्वणीच होती ही.. एकदम पैसा वसूल काम !! ..बाजूच्याच बोर्ड वर .. संध्याकाळी कोणकोणते मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहेत याची लिस्ट होती.. त्यात संगीत खुर्ची, डी. जे. ,