योगी अरविन्द

  • 12.8k
  • 3.5k

उद्धव भयवाळ औरंगाबाद योगी अरविंद १५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. परंतु १५ ऑगस्ट या दिवसाला आणखी एका दृष्टीने खूप महत्त्व आहे हे पुष्कळ लोकांना ठाऊक नसेल. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माच्या इतिहासात या दिवसाला महत्त्व प्राप्त झाले ते १५ ऑगस्ट १८७२ रोजी महान संत, तत्त्वज्ञानी, योगी अरविंदांचा जन्म झाला म्हणून !१५ ऑगस्ट १९७२ रोजी सर्व भारतीयांनी स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा केला आणि योगी अरविंदांची जन्मशताब्दीही त्याच दिवशी आली हा एक अपूर्व योगच म्हटला पाहिजे.भारतमातेच्या महान पुत्रांपैकी एक असलेले श्री अरविंद यांनी भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्या वेळच्या अनेक थोर पुरुषांप्रमाणेच श्री