रांगडं कोल्हापूर .. भाग १

  • 9.4k
  • 4.1k

"कवा आलासां ? " "आज सकाळी आलो.. महालक्ष्मी एक्स्प्रेस ने..""रातच्याला घरी या ...""नाही अहो, आजच मुंबईला परत निघायचं आहे, तिकीट आहे रात्रीच्या ट्रेनचे""यायला लागतंय, नाही म्हणायचं न्हाय""इकडं पावणा आला की दोन चार दिस राहतूया बगा..""राजेंद्र, घिऊन ये पावण्यासनी संध्याकाळच्याला.."अस्सल कोल्हापुरी भाषेत आमच्या पाहुणचाराला सुरवात झाली..राजेंद्रच्या( अनिलचा मित्र) घरी आलो... त्याची बायको राणी , माझीही मैत्रीण.. दोघंही नवरा बायको डॉक्टर आहेत.."आज खूप वर्षांनी आलासा बगा.."" आर्याला आणायचं होतसा.. पोरांनी चिक्कार मजा केली असती ..""अगं, आर्याचे बारावीचे क्लास आहेत.. म्हणून नाही आली..""हर्ष आणि छोटा कसा आहे तुमचा..""हर्ष शांत आहे बगा.. पण बारका कधी कधी लई वांडगिरी करतंय..त्याला विजापूरला टाकला सैनिक शाळेत....."अस आमचं