हिरवे नाते - 2 - नियती

  • 8.3k
  • 4k

                                                                                                नियती ग्रॅज्युएट झालो आणि नोकरी मिळवण्याची धडपड चालू झाली. खूप मोठी स्वप्न उराशी होती. खूप पैसे कमवायचे होते. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारीही होती. आईला हे सगळे बोलून दाखवताना एकप्रकारचा अहंभाव तिला जाणवत होता. ती बोलूनही दाखवायची पण माझ्या तारुण्यातल्या धुमाऱ्यां पर्यन्त तिचे शब्द पोहोचत नव्हते. बाबा हे तारुण्याचे वारे जाणून होते.