वारी...अशीही

  • 8.2k
  • 2.7k

वारी …अशीहीअंथरुणावर पडल्या पडल्या रखमा स्वतःशीच बोलत होती… "विठ्ठला अरे तुझ्या वारीला यायचं होतं रे ! पण कसे येणार? आज पर्यंत एकही वारी मी चुकवली नाही.अरे तुला भेटण्याची ओढ इतकी असते की ती ओढ एक ताकद बनून पाठीशी उभी राह्याची. कुठल्याही संकटाला पळवून लावायची. विठुराया तुझी तुळशी माळ तर मला फारच आवडते. ती गळ्यात घातली की मनाला अत्यंत समाधान मिळतं. तुझ्याशी सरळ सरळ संवाद साधण्याच समाधान मिळतं. विठ्ठला आता मी कशी येणार रे तुला भेटायला? माझा जो सहचरी होता त्याला तू कायम वारीसाठी घेऊन गेलास आता मी एकटी पडले त्यात भर म्हणून माझं पाय मोडला. आता कशी येणार मी? "एवढं