कंस मज बाळाची - भाग १० (अंतिम भाग)

  • 6.2k
  • 3.2k

आसं मज बाळाची भाग १०मागील भागावरून पुढे...अनघाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमासाठी माधवराव आणि मालतीबाई म्हणजेच वैभवाचे आईवडील आले होते.माधवरावांनी या संपूर्ण कार्यक्रमात फक्त मालतीबाई कडेच लक्ष देण्याचं काम केलं कारण त्यांना आपल्या बायकोच्या कुचकट स्वभावामुळे तिच्यावर विश्वास नव्हता. मालतीबाईंना ते क्षणभर दृष्टीआड होऊ देत नव्हते.एकदा मालतीबाईनी विचारलही "काय तुम्ही सारखे माझ्या मागे मागे करतात? असं करत नाही तुम्ही कधी?""हो मी नेहमी असं करत नाही पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. कुठे आनंद दिसला की त्याच्यावर विरजण कसं घालता येईल याचाच विचार तू करत असते.म्हणून मला तुझ्यावर लक्ष ठेवावं लागतंय."माधवरावांच्या या बोलण्यावर मालतीबाईं रागानी नाकाचा शेंडा उडवून तरतर चालत सोफ्यावर जाऊन बसल्या. शांतपणे