निष्प्राण

(11)
  • 16k
  • 1
  • 5.1k

      "हेलो कुठ आहे? आणखी किती वेळ लागणार ?"मोबाईल कानाला लावतच समोरून येणाऱ्या उत्तराची वाट बघत बसलेली ' ति' थोडी रागातच बोलत होती.       "फक्त दहाच मिनिटे गं, बॅगेत पाण्याची बाटली आईने बनवलेलं काही खायला घ्यायचं राहून गेलं होत." समोरून येणाऱ्या उत्तराने ' ति ' समोर बोलू लागली       "थोड लवकर गं , ११:३० ची शेवटची ST आहे ती चुकवू नकोस म्हणजे झालं. वाट बघतेय लवकर ये, ठेवते फोन."          बोलतच कानाला लावलेला मोबाईल डोळ्याच्या समोर आणून सुरू असलेला कॉल कट केला. मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या काचेत डाव्या बाजूला नजर फिरवली तर १०:४५ ची वेळ झालेली तिच्या लक्ष्यात आलं. आजूबाजूला नजर