ह्याला जीवन ऐसे नाव - भाग १

  • 10.2k
  • 5.1k

ह्याला जीवन ऐसे  नाव भाग  1 पंडित च्या ऑफिस मध्ये पंडितला ला आज farewell पार्टी होती. सगळे जण भरभरून बोलत होते. त्याला कारणही तसंच होतं. पंडित, वर पासून खालपर्यंत लोकप्रिय होता. कामात अत्यंत हुशार, आणि कर्तव्य दक्ष होता. कोणालाही मदत करायला सदा सर्वदा तयार. तो ऑफिस मध्ये कितीही थांबायला कायमच तयार असायचा. मृदुभाषी आणि प्रेमळ. या त्यांच्या गुणांमुळे तो सर्वांनाच हवा असायचा. त्यांच्या कंपनी ने VRS जाहीर केली तेंव्हा पंडित ने लगेच फॉर्म भरून टाकला. त्याचा साहेब तर वेडाच झाला. त्यांनी तऱ्हे तऱ्हेने पंडितची समजूत काढायचा प्रयत्न केला पण पंडित आपल्या निर्णयावर ठाम होता. सर्वांनीच त्याला खोदून खोदून कारण विचारलं