भाग १०. गुंजन दिल्लीला निघून गेली होती. पण इकडे वेदला मात्र घरी आल्यावर घर अस शांत वाटत होते. कारण गुंजन नव्हती त्या घरात. आता तर त्याला तिची एवढी सवय झाली होती की, घरात उगाच तिचे असल्यासारखे भास होत होते. तो मनाला समजावत हॉल मधील सोफ्यावर शांत पणे मागे डोकं टेकवून डोळे बंद करून बसतो. पण तेवढ्यात त्याला काहीतरी आठवत तस तो झटकन डोळे उघडतो. "ओ, गॉड . गुंजन कडे माझा फोन नंबरच नाही आहे आणि तिचा देखील माझ्याकडे नाही आहे. आता कसा कॉन्टॅक्ट करू मी तिच्यासोबत? दिल्लीतील हॉटेलचा नंबर असेलच ना? त्यावर कॉल करून पाहतो मी" वेद अस स्वतःशीच बोलून