डिकीतला सस्पेन्स - भाग १

  • 11.8k
  • 5.7k

डिकीतला सस्पेन्स  भाग  १   रात्रीचे अकरा वाजले होते. लातूर सोलापूर मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा काळ होता, आणि एका  लाल रंगाच्या कार मध्ये कॅश घेऊन चालले आहेत अशी खबर होती. आता पर्यन्त पांच कार चेक करून झाल्या होत्या. रहदारी चालूच होती पण लाल कार नव्हती त्यामुळे पोलिस जरा आळसावून बसले होते. अशातच एक लाल कार येतांना दिसली. पोलिसांनी कार थांबवली. “साहेब, कार चेक करायची आहे. आपण जरा बाहेर येता का ?” – पोलिस. “का काय झालं ?” दिनेश ने विचारलं. “चेकिंग होऊ द्या मग सांगतो आम्ही.” – पोलिस. “ओके. करा चेक.” – दिनेश म्हणाला आणि गाडीतून