डिकीतला सस्पेन्स - भाग ३

  • 8.1k
  • 4.5k

  डिकीतला सस्पेन्स  भाग ३   भाग २ वरून पुढे वाचा .........   सांगोळे काशीनाथला घेऊन आला. “काशीनाथ तू हरीष ला ओळखतो. ?” – शेंडे. “हो. साहेब.” – काशीनाथ. “तो कुठे आहे ?” – शेंडे. “काय झालं साहेब ? काय केल त्यांनी ?” – काशीनाथ. “फालतू प्रश्न विचारू नकोस. तो कुठे आहे ते सांग.” शेंडे साहेबांनी कडक स्वरात विचारलं. “गोंदियाला गेला आहे साहेब. त्याचं घर आहे गोंदियाला.” – काशीनाथ. “कशाकरता गेला आहे ?” – शेंडे. “त्याचं लग्न ठरलं आहे अस म्हणत होता साहेब.” काशीनाथ. “कोणाशी ? आणि केंव्हा आहे लग्न ?” शेंडे. “कोणाशी ते नाही सांगितलं. गुपित आहे म्हणत होता.”