भाग २०. वेद तर जागी बसल्या बसल्या आईजवळ झोपून जातो. पण दिल्लीत मात्र गुंजन वेदने कॉल नाही उचलला म्हणून काळजी करत जागी राहते. मन उगाच तिचं अस्वस्थ होत होते. नकोते विचार देखील तिच्या मनात येऊन जातात. ती आपल्या मोबाईलकडे पाहतच रात्रीची बेडवर झोपून जाते. आज वेदला लवकरच जाग आली होती. त्याने उठून आधी आईला चेक केलं आणि नंतर मग तो तसाच आपलं आवरायला निघून गेला. आज आई घरात आहे त्यात तिला बरं नव्हतं म्हणून, तो ऑफिसला न जाण्याच ठरवतो. स्वतःच सगळं आवरुन खाली हॉलमध्ये येऊन आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसतो. "आईची अशी अवस्था केली आहे या लोकांनी ना? आता