भाग २४. गुंजन आणि वेदचे दिवस चांगले जात होते. पण इकडे जाधवांच्या घरी मात्र काही चांगल घडत नव्हते. कारण डेझी होती. ती आजवर जाधवांनी जी काम कधीच केली नव्हती. ती करायला लावत असायची. लिगली डेझीने जाधवांच्या प्रॉपर्टीवर अधिकार मिळवला होता. तसे पुरावे देखील तिच्याकडे होते. "वेद, अहो तुम्ही किती काम करता ना? मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही दोन मिनिट इथे बसा!!", गुंजन आपला राग शांत करत म्हणाली. वेद रुम मध्ये इकडून तिकडे कॉल वर बोलत आपल फिरत होता. गेले दोन अडीच तास त्याच असेच चालू होत. गुंजनने दोनदा नाष्टा आणला होता त्याच्यासाठी. पण महत्त्वाचे काम असेल? असा विचार करून ती