गुंजन - भाग ३४

  • 7.6k
  • 2.5k

भाग ३४."अनय, अनय. मला खूप त्रास होत आहे. प्लिज, तुम्ही मला सोडून जाऊ नका", मायरा वेदनेने विव्हळत म्हणाली. मध्यरात्री एकच्या दरम्यान तिला प्रस्तुती कळा यायला सुरुवात झाली होती. अनयने डेझीच्या मदतीने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये आणले. "माऊ, थोडस पेन सहन कर. फक्त थोड.", अनय तिला धीर देत म्हणाला. खरतर तिचे रडणे पाहून त्याला देखील वाईट वाटत होते. पण तिच्यासमोर तो स्वतः ला मजबूत दाखवत होता. "खूप पेन करत आहे अनय. आपल्या बाळाला काही होणार नाही ना? मॉम मला माझी मॉम हवी आहे!! भाई आणि वहिनीला बोलावं ना माझ्यासाठी प्लीज.", मायरा डोळ्यात पाणी ठेवून म्हणाली. या क्षणी तिला तिच्या घरच्या लोकांची खूप