आरोपी - प्रकरण १

  • 17.8k
  • 1
  • 11.4k

आरोपीप्रकरण १ पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी त्यादिवशी ‘मदालसा’ नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण घेत होते पाणिनी सौम्याकडे बघून काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याला आपल्या टेबलाजवळ एक सावली हलताना दिसली म्हणून त्यानं दचकून वर बघितलं तर त्या हॉटेलचा मालक मधू राजे त्याच्या जवळ उभा होता पाणिनी हा त्याचा नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दोघांची तशी ओळख होती“कसं काय चाललय मिस्टर पाणिनी पटवर्धन?”मधु राजेंनी पाणिनी ला विचारलं“एकदम छान मस्त चाललंय आणि तुमच्याकडे जेवण तर काय सुंदरच असत” पाणिनी म्हणाला “आणि आमची सर्विस कशी आहे?”“एकदम अप्रतिम. लेडीज वेट्रेस हे तुमच्या हॉटेलचं विशेष आकर्षण आहे मिस्टर राजे” पाणिनी म्हणाला.“मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला आमच्या