Aaropi book and story is written by Abhay Bapat in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aaropi is also popular in थरारक in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
आरोपी - कादंबरी
Abhay Bapat
द्वारा
मराठी थरारक
पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी त्यादिवशी ‘मदालसा’ नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण घेत होते पाणिनी सौम्याकडे बघून काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याला आपल्या टेबलाजवळ एक सावली हलताना दिसली म्हणून त्यानं दचकून वर बघितलं तर त्या हॉटेलचा मालक मधू राजे त्याच्या जवळ उभा होता पाणिनी हा त्याचा नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दोघांची तशी ओळख होती
“कसं काय चाललय मिस्टर पाणिनी पटवर्धन?”
मधु राजेंनी पाणिनी ला विचारलं
“एकदम छान मस्त चाललंय आणि तुमच्याकडे जेवण तर काय सुंदरच असत” पाणिनी म्हणाला
“आणि आमची सर्विस कशी आहे?”
“एकदम अप्रतिम. लेडीज वेट्रेस हे तुमच्या हॉटेलचं विशेष आकर्षण आहे मिस्टर राजे” पाणिनी म्हणाला.
“मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला आमच्या सर्विस बद्दल विशेषत्वाने विचारायचं कारण असं की तुम्हाला आत्ता जी मुलगी वेट्रेस म्हणून सर्विस देते आहे तिने तुमचं टेबल मुद्दामून दुसऱ्या वेट्रेस कडून मागून घेतलंय”
“म्हणजे? मी नाही समजलो” पाणिनी म्हणाला.
“म्हणजे असं की आत्ता जी मुलगी तुमच्यासाठी तुम्ही दिलेले खाद्यपदार्थ घेऊन आली ती मुलगी तुमच्या टेबलावरची वेट्रेस नव्हती. तुमच्या टेबलावरची वेट्रेस वेगळीच आहे. शेजारच्या वेट्रेस ने तुमच्या टेबलावरच्या वेट्रेस कडून तुमचं टेबल मुद्दामून मागून घेतलय”.
आरोपीप्रकरण १ पाणिनी पटवर्धन आणि सौम्या सोहोनी त्यादिवशी ‘मदालसा’ नावाच्या एका पॉश रेस्टॉरंट मध्ये दुपारचं जेवण घेत होते पाणिनी सौम्याकडे बघून काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याला आपल्या टेबलाजवळ एक सावली हलताना दिसली म्हणून त्यानं दचकून वर बघितलं तर त्या ...अजून वाचामालक मधू राजे त्याच्या जवळ उभा होता पाणिनी हा त्याचा नेहमीचा ग्राहक असल्यामुळे दोघांची तशी ओळख होती“कसं काय चाललय मिस्टर पाणिनी पटवर्धन?”मधु राजेंनी पाणिनी ला विचारलं“एकदम छान मस्त चाललंय आणि तुमच्याकडे जेवण तर काय सुंदरच असत” पाणिनी म्हणाला “आणि आमची सर्विस कशी आहे?”“एकदम अप्रतिम. लेडीज वेट्रेस हे तुमच्या हॉटेलचं विशेष आकर्षण आहे मिस्टर राजे” पाणिनी म्हणाला.“मिस्टर पटवर्धन, मी तुम्हाला आमच्या
प्रकरण २ दुसऱ्या दिवशी ऑफिस उघडलं तेव्हा दहा नंतर सौम्या चा इंटरकॉम पाणिनी पटवर्धनांच्या केबिन मध्ये वाजला. “बाहेर मिस अलुरकर आली आहे.” सौम्या म्हणाली “मिस अलुरकर कोण?” पाणिनी ने कपाळावर आठ्या घालत विचारलं. “सर. मिस अलुरकर म्हणजे काल आपल्याला ...अजून वाचावेट्रेस, क्षिती अलुरकर. तुमचा अंदाज बरोबर ठरला सर, ती आली आज ऑफिसला.” “अरे वा ! तिला आत पाठव सौम्या, आणि तू ही ये.” “मिस्टर पटवर्धन मी खरंच माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, तुमचे कसे आभार मानू मला समजून घेतल्याबद्दल ! आणि आजची अपॉइंटमेंट दिल्याबद्दल” पाणिनी हसला, “मला वाटतं किती मी दिलेली टीप पुरेशी होती कालची?” क्षिती ने आपल्या पर्समधून
प्रकरण तीन “किती पैसे होते त्यात?” - पाणिनी “काही सांगता येणार नाही पन्नास,पाचशे आणि दोन हजाराच्या च्या नोटा होत्या सगळ्या.” “आणि इतर खोक्यात काय होतं?” “मला माहित नाही. मी खोकं बंद केलं आणि कपाटाचं दार ही बंद केलं. मला ...अजून वाचावाटते पटवर्धन सर, जर का काही चोरी दरोडा पडला घरात..... आम्ही दोघीच बायका घरी राहतो. म्हणजे लक्षात येत आहे ना... आणि अगदी दरोडा किंवा चोरीच सोडा जेव्हा एखादा माणूस अशा प्रकारची रोख रक्कम खोक्यांमध्ये भरून घरी ठेवतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी सुद्धा ही रक्कम ठेवलेली असू शकते. जर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला कळलं तर काय होईल?”
प्रकरण चार कनक ओजस ची विशिष्ट प्रकारे दारावर केलेली टकटक पाणिनीने ऐकली त्यावेळी संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. सौम्या ने दरवाजा उघडला आणि कनक आत आला. “ हाय कनक ,आता मी सगळं आवरून निघायच्या तयारीत होतो.” पाणिनी म्हणाला. “मला ...अजून वाचाहोताच तो की तू आज लवकर ऑफिस बंद करून तुझ्या या चिकण्या सेक्रेटरी ला घेऊन कुठेतरी कॉफी हाउस मध्ये जाऊन बसणार असशील. माझ्या वाट्याला तुझ्या खर्चाने खादाडी करायचं भाग्य कधी लागणार आहे कोण जाणे.” “बर बोल, काय विशेष ?” पाणिनी न विचारलं “काही नाही, असे काही प्रसंग घडलेत की त्यामुळे मलाच कोड्यात पडल्यासारखं झालंय.” “काय घडलय विशेष?”- पाणिनी न विचारलं
प्रकरण ५ “मिस्टर पटवर्धन मला असं इथून लगेच निघता येणार नाही. मी माझ्या खोलीतून काही आणले नाहीये. म्हणजे अगदी दात घासायचा ब्रश टूथपेस्ट सुद्धा घेतलेलं नाहीये.” क्षिती म्हणाली “टूथ ब्रश आणि टूथपेस्ट पेक्षा इतर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्येत. ...अजून वाचानिघतोय.” पाणिनी म्हणाला “तुझ्याबरोबर तू तुझी पर्स घेतलेली दिसतेस !” “हो. एवढ्या सगळ्या त्या गोंधळात आणि हातघाईच्या लढाईत मी पर्स मात्र घेतली.”-क्षिती “किती मोठी लढाई झाली?” - पाणिनी “शारीरिक लढाई नाही पण तोंडा तोंडी खूप झाली.”-क्षिती “आणि तू काय सांगितलंस त्यांना?” “मी काही सांगितलं नाही. तुम्ही जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढं फक्त सांगितलं. मी सांगितलं की मी काहीही पैसे चोरले