जीवन निळ्याभोर आकाशाखाली, झाडाच्या गर्द सावलीत निखिल एकटाच बसला होता. उव्दिग्न मनःस्थितीने त्याला सभोवतालचे सौंदर्यही जाणवत नव्हते. शुन्यात एक केंद्रबिंदू बनवून त्यातच हरवून गेला होता. काय झाले एव्हढे आपल्याला की जीवनातला रसच संपवून निरसता यावी. सगळ्या जाणिवा बोथट व्हाव्या ? कुठेही कशाची कमी नाही. आई वडील अतिशय महत्वाकांक्षी नव्हते. सहज जीवन जगण्याकडे त्यांचा कल