बॅग पॅक टूर टू कर्नाटका...- भाग 1

  • 9.8k
  • 4.4k

बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!आम्ही दोघांनी आतापर्यंत महाराष्ट्र देशा ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती केली होती पण बॅग पॅक टूर केली नव्हती.. त्यामुळे पहिल्यांदा ही तीन दिवसाची टूर करायला आम्ही खूप उत्सुक होतो.आता बघा ना, तीन चार दिवसाच्या फॅमिली ट्रीपला जायचं असेल तरीही, नाही नाही म्हणता दोनतीन बॅगा सहज पॅक होतात...बॅगपॅक टूरमध्ये मात्र प्रत्येकी एकच बॅग असावी आणि तीही शक्यतो पाठीवर अडकवता येईल अशी..अशा टूर मध्ये आपलं जास्त लक्ष पॉइंट्स कव्हर करण्याकडे असतं. त्यामुळं वेळ प्रसंगी आपली बॅग आपल्याला बरोबर घेऊनही फिरावं लागतं.. म्हणून गरजेचं पण कमीत कमी सामान आणि कपडे बॅग पॅक टूरठरल्याप्रमाणे गरजेपुरतं सामान